मुरूम (प्रतिनिधी)- संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली) सोलापूर झोनच्या मुरूम ब्रांचच्या वतीने 'मुक्ती पर्व दिवस' आणि 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता. 15) बेरडवाडी शिवारात भव्य वनीकरण व वृक्ष लागवड मोहीम उत्साहात राबविण्यात आली. मुरूम ते बेरडवाडी रोडवरील शिव मारुती मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा विविध जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या मोहिमेत पर्यावरणपूरक आणि ऑक्सिजन देणाऱ्या विविध प्रकारच्या 35 प्रजातींची एकूण 600 रोपांची लागवड करण्यात आली. या सर्व रोपांच्या संगोपनाची जबाबदारीही निरंकारी सेवादल व स्थानिक ग्रामस्थांनी स्वीकारली आहे.
या वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कल्लाय्या स्वामी, कळंबचे प्रचारक विजय काळे, रोटरियन मल्लिकार्जुन बदोले, चंद्रकांत चव्हाण (पुणे), ब्रँच मुखी दयानंद साखरे (मुरूम), रोटरीचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, बेरडवाडीचे उपसरपंच दशरथ मंडले, हरीकिशन पवार (येळी), सेवादल इन्चार्ज बिरू बंदीछोडे, युवराज बनसोडे (बलसुर), सुभाष घोरपडे (महालिंगरायवाडी) यांच्यासह हणमंत मंडले, सुरेश मंडले, हणमंत पोतदार, कल्लेश्वर पांचाळ, सुरेश कोळी, तुकाराम शेवाळे, सुधाकर नारायणकर, सुधाकर जाधव, प्रा. त्र्यंबक व्हटकर आदींच्या उपस्थितीत पार पडला. मोहिम यशस्वी करण्यासाठी राम भोकले, परमेश्वर वासुदेव, अरुण पोतदार, लक्ष्मण राठोड, बेबी चव्हाण, कमल शेवाळे, मीरा मोटे, सुनिता व्हटकर, सुषमा नाकाडे, सेवादल प्रमोद नारायणकर, गुंडेराव चौगुले, दयानंद व्हनाळे, शिवानंद बिराजदार, विष्णू पवार, अनुसया नारायणकर, उषा साखरे, समर्थ साखरे, गुरुदेवी बोडरे, प्रसाद सुपेकर, मनश्री मोटे, श्रद्धा साखरे, यशोदा बोडरे आदींनी पुढाकार घेतला. उमरगा तालुक्यातील सर्व साधसंगत, प्रबंधक, महापुरुष, माता-भगिनी, निरंकारी सेवादल मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदान केले व आपले अमूल्य योगदान दिले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे मुरूम व बेरडवाडी परिसरात उत्साहाचे व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असून, संत निरंकारी फाऊंडेशनच्या या निसर्ग संवर्धनाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
