तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी 2 किलो 134 ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला.
प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी 2 किलो 134 ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी अर्पण केला. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने प्रणय बेमलखेडकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अमोल कर्डिले, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
