तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्रशालेत प्रवेश तर इ़ग्लिश स्कूल मध्ये अध्यापन? असा प्रकार होत आहे का? हा संशोधनाचा विषय आहे.
याची सविस्तर माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील तेर येथे जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचा प्रवेश टीसी प्रशालेला देऊन घ्यायचा परंतू संबंधित विद्यार्थी, विद्यार्थीनी हे संबंधित जिल्हा परिषदेच्या प्रशालेत अध्यापन न करता खाजगी इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापन करतात.ज्यावेळी इंग्लिश स्कूलमधून विद्यार्थी, विद्यार्थीनी येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर पालक टीसी इंग्लिश स्कूलला मागतात. त्यावेळी इंग्लिश स्कूलचे संबंधित इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापन घेतलेल्या विद्यार्थी,विद्यार्थीनी यांना इंग्लिश स्कूलचा टीसी न देता जिल्हा परिषदेच्या प्रशालेचा टीसी देतात? जिल्हा परीषद प्रशाला ही विद्यार्थी,विद्यार्थीनी संख्या जादा दिसावी व शिक्षक, शिक्षीका यांची संख्या विद्यार्थी, विद्यार्थीनी अभावी कमी होऊ नये म्हणून असे प्रकार करतात? याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रशालेची विविध कारणांसाठी तपासणी होते त्यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रशालेत प्रवेश घेतलेले परंतू अध्यापन इंग्लिश स्कूलमध्ये करणारे विद्यार्थी,विद्यार्थीनी दिसून येत नाहीत? संबंधित याबाबत वरीष्ठाना योग्य अहवाल दिलेला आहे का हेही पहाणे आवश्यक आहे.जिल्हा परीषदेच्या प्रशालेत विद्यार्थी, विद्यार्थीनीचा प्रवेश घेतलेले परंतू इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापन करणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी ही गंभीर बाब शिक्षण विभागाच्या वरीष्ठांना लक्षात कशी येत नाही हा संशोधनाचा विषय आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रशालेत विद्यार्थी, विद्यार्थीनी प्रवेश घेऊन अध्यापन इंग्लिश स्कूलमध्ये घेतात.ही बाब अतिशय गंभीर आहे.
-संजय लोमटे, सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद कन्या प्रशाला,तेर
जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थी, विद्यार्थीनी यानी प्रवेश घेतला पण अध्यापन इंग्लिश स्कूलमध्ये घेत असतील तर संबंधितांविरुद्ध कार्यवाही करता येते.
-राजाभाऊ पडवळ, मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाला,तेर