तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.धाराशिव तालुक्यातील तेर येथे बसस्थानकाची जागा मोठी असून बसस्थानक बांधलेल्या इमारतीच्या पाठीमागे प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधी पसरली आहे.                           

नागरीक चक्क लघुशंका करण्यासाठी वापर करीत आहेत.त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वरीष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.बसस्थानकातील घाणीचे साम्राज्य दुर करणे आवश्यक आहे.

 
Top