धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील मुक्तांगण प्रायमरी इंग्लिश स्कूल व पेंग्विन प्री प्रायमरी स्कूल येथे दिनांक 16 जुलै 2026 वार गुरुवार रोजी माता पालक संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीस डॉ. पल्लवी कोथळकर, डॉ.यशश्री सोनवणे, डॉ. स्वप्ननंदा कुलकर्णी व संस्थेच्या संस्थापिका श्रीमती कमलताई नलावडे यांची उपस्थिती होती.

बैठकीची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.  बैठकीमध्ये माता-पालक संघाची स्थापना करण्यात येऊन माता पालक संघाचे उद्दिष्टे व कार्य माता पालकांना सांगण्यात आले. तसेच डॉ. पल्लवी कोथळकर यांनी मुलांचा आहार, विहार तसेच मोबाईलचे दुष्परिणाम व त्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. बैठकीस माता पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठक यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top