वाशी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ, वाशी तालुका कार्यकारिणीच्या वतीने वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल, पुष्पगुच्छ, फेटा देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी पोलीस पाटील हे गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासन व पोलीस पाटील यांच्यातील समन्वय अधिक दृढ राहावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे वाशी तालुकाध्यक्ष शंकर अहिरे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बिभीषण थोरबोले, महिला जिल्हा संघटक ज्योत्सना सोनवणे, तालुका संघटक नितीन देशमुख, तसेच पोलीस पाटील मनीषा कवडे, उमादेवी चेडे, उमेश येडे, विनोद क्षीरसागर, शिवाजी भैरट, सचिन डोंगरे, दादाराव खरात यांच्यासह तालुक्यातील अनेक पोलीस पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
