धाराशिव (प्रतिनिधी)-  वयोवृद्ध दाम्पत्याला लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या कारवाईत 02 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 36 हजार रूपये किमतीचे मनी मंगळसूत्र व ओपो कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी कासार व पथक यांनी त्यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी सदर गुन्हयासह पोलीस स्टेशन भूम येथील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली.

या कारवाईत शिवराम उर्फ बेवड्या धनाजी पवार (वय 21) रा लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा व आकाश उर्फ बबलू दादाराव पवार (वय 19) रा. मोहा पारधी पेढी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या आणखी एका साथीदाराचा सहभाग निष्पन्न झाला आहे. आरोपींकडून मनी मंगळसूत्र व ओपो कंपनीचा मोबाईल असा 36 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि. सुदर्शन कासार, पोह. शौकत पठाण, पोह. प्रकाश औताडे, पोह. जावेद काझी, पोह. फरहान पठाण, चापोह. नागनाथ गुरव, चापोह. रत्नदीप डोंगरे तसेच क्युआरटी पथक धाराशिव यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.


 
Top