भूम (प्रतिनिधी)-  प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये आज आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक पद्धतीने वारकरी दिंडी सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला तसेच कारगिल विजय दिना निमित्त शहीदाना अभिवादन करण्यात आले. ‌‘पुंडलीक वरदा हरि विठ्ठल' आणि ‌‘ज्ञानोबा-तुकाराम' सह कारगिल दिन चिरायू होवो च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय  व देशभक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघाला.

विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, फुगडी, भगवे झेंडे आणि फुलांची पालखी घेऊन दिंडीत सहभाग घेतला. वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईची भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तर भारतीय जवानांचे पोशाख व रायफल बंदूक घेऊन बाल विद्यार्थ्यानी जयघोष केला. शाळेच्या शिक्षकांनीही दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पालखी पूजन करून मिरवणूक समर्थ नगर भागातुन परंडा रोड, फ्लोरा चौकातून काढण्यात आली. यावेळी शिक्षकवृंद आणि पालक उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कृतीचा आणि शिस्तीचा परिचय करून देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, श्रद्धा आणि आनंद यांचे सुरेख मिश्रण पाहायला मिळाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका मेघा सुपेकर, ऐश्वर्या बोत्रे, दिपीका टकले, रोहिणी गवळी यांच्यासह अरुणा बोत्रे व आशा म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले.


 
Top