धाराशिव (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती-जमाती निवासी शाळांमध्ये धाराशिव सेवक फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

यावेळी सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी माहीती देऊन जागृतता निर्माण झाली पाहिजे. प्लॉस्टिक पासुन चे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण दक्षता घ्यावी असे आवाहन केले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी उपस्थित मान्यवरांचे महापुरुषांच्या जीवनावरील पुस्तके देऊन स्वागत केले.तसेच कारगिल विजय दिनानिमित्त देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीदांच्या त्यागाला अभिवादन केले.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,सुरक्षा समिती सदस्य अब्दुल लतीफ, सुरक्षा समिती सदस्य तथा मतदार जनजागरण समिती कार्याध्यक्ष गणेश वाघमारे,धाराशिव सेवक फाऊंडेशनचे विवेक यादव,विजय राठोड, दिनेश देवकते,प्रकाश चव्हाण,ओम लोखंडे,तसेच समाज कल्याण लिपिक कपील थोरात,शाळेचे मुख्याध्यापक सितोळे,वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी शाळे त उपस्थित कर्मचाऱ्यांची नावे श्री शितोळे ए एस, श्री सानप ए आर,श्री खुणे ए जे,श्रीमती सुतार जे,श्रीमती जानराव,श्रीमती कांबळे,शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.सुत्रसंचलन श्री.सानप सर यांनी तर आभार सितोळे यांनी मानले.

 
Top