धाराशिव (प्रतिनिधी)- एस.सी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जिल्हास्तरावर व्यापक जनआंदोलन उभारण्यासाठी आज धाराशिव येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आगामी आंदोलनाचे नियोजन,जनजागृती आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये समन्वय साधण्यासाठी 37 सदस्यीय समन्वय समितीची एकमताने घोषणा करण्यात आली.
समन्वय समितीमध्ये राजाभाऊ ओव्हाळ,धनंजय शिंगाडे, नितीन शेरखाने, कैलास शिंदे, संजयकुमार बनसोडे, विद्यानंद बनसोडे,ॲड. साबने,राजाभाऊ राऊत, सतपाल बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, ॲड.गणपती कांबळे, हरिश डावरे, डी. जी. होसलमल, भाई फुलचंद गायकवाड, बंडूभाऊ बनसोडे, अरुणभाऊ बनसोडे, शांतीनाथ शेरखाने, आनंद पांडागळे, ॲड. के. टी. गायकवाड,एस. के.चेले, भालचंद्र कठारे,अनिल हजारे, सुनिल गायकवाड, मनिष सोनकवडे,राजेंद्र निकाळजे, काका भंडारे,महादेव वाघमारे, विकास बनसोडे, धनराज सोनकवडे, सुनील वाघमारे,फकीरा सूरवसे, कुंदन वाघमारे, किशोर वाघमारे, बाबा मस्के, दादा सरवदे,राजश्री कदम आणि विजय बनसोडे यांचा समावेश करण्यात आला. बैठकीत एस.सी. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाभर जनजागृती अभियान राबविणे असे ठरविण्यात आले आहे.
यावेळी दि. 27 जुलै 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य संविधान बचाव मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. कुंदन वाघमारे यांची प्रसिद्धीप्रमुख म्हणून एकमताने निवड करण्यात आली.