तुळजापूर (प्रतिनिधी)- दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला तुळजापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. याबाबतचे निवेदन गुरुवारी (दि. 23 जुलै) तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले.
निवेदनात दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच नेट, यूजी आणि टीईटी प्रकरणांतील कथित गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दुपार नंतर बद मागे घेण्यात आला. निवेदनातून करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या बंद साठी मराठा आरक्षण समिती, स्वराज्य संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, शिवसेना संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.
