धाराशिव (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय धाराशिव येथे कार्यरत असणार मराठी विषयाचे प्रा. रवी सुरवसे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पीएचडी प्रदान करण्यात आली.
प्रा. रवी सुरवसे गेली 20 वर्षापासून पुरोगामी चळवळीत काम करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने शहरात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीला गती देण्याचे काम ते करत आहेत. त्यांच्या संशोधनाचा विषय “आंबेडकरी विचारातून निर्माण झालेल्या मराठवाड्यातील निवडक मराठी साहित्याचा अभ्यास “ हा होता. या संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून बलभीम महाविद्यालय बीड येथील मराठी विभाग प्रमुख, मराठी संशोधन केंद्राचे प्रमुख सुप्रसिद्ध समीक्षक विचारवंत प्रोफेसर डॉ. मनोहर सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या अंतिम मौखिकी परीक्षेत बाह्य परीक्षक म्हणून पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. संदीप सांगळे हे होते. तर या मोखीची परीक्षेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रो. डॉ. विनोद राठोड हे होते.
त्यांच्या या यशाबद्दल राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शशिकलाताई घोगरे, उपाध्यक्ष ऍड. अविनाश राव देशमुख, कार्याध्यक्ष एम. डी देशमुख, संस्था सचिव भाई धनंजय पाटील, प्राचार्य व्ही के देशमुख, उपप्राचार्य बी जे कुंभार, पर्यवेक्षक ए. के. दीक्षित, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांच्या अभिनंदन केले. त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटना राजश्री शाहू महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ कनगरा, रमाई फाउंडेशन, तुलसी फाउंडेशन बीड, राजगीर वधू वर सूचक मंडळ धाराशिव, तथागत प्रतिष्ठान कनगरा, सेवानिवृत्त मागासवर्गीय कर्मचारी संघटना, जेतवन कॉलनी शाहूनगर कर्मचारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच या सर्व सामाजिक संघटनांनी त्यांचे सत्कार केले.
