तेर( प्रतिनिधी)- आळंदी येथून पंढरपूरला आषाढी सोहळ्यासाठी निघालेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना बेसन भाकरी वाटपाची सेवा देण्यासाठी तेर येथून भाकरी व बेसन पिठ संकलित करण्यात आले.
यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप तेर यांनी भाकरी व बेसनपीठ संकलन केले. तेर येथे भाकरी व बेसनपीठ संकलनात ग्रामस्थानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संकलीत केलेल्या बेसनपीठ व भाकरी पालखी मुक्कामस्थळी वारकऱ्यांना देण्यात येणार आहेत संकलन केलेल्या बेसन पीठ व भाकरी गोळा करण्यासाठी सुनिता पांचाळ, भाग्यश्री भक्ते 'आशा माळी, गीता नाईकवाडी, सुमन नाईकवाडी, उर्मिला पांचाळ, ओम नाईकवाडी, विजयसिंह फंड, नारायण साळुंके , बबन कोकरे आदींनी परिश्रम घेतले.
