धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये शासनाच्यावतीने देण्यात येणारे मोफत शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले त्यामध्ये इ.5 वी 568, इ. 6 वी 684 , इ. 7 वी 741 , इ.8 वी 984 च्या विद्यार्थ्यांना ग्रंथपाल तुकाराम फंड, पल्लवी काकडे यांनी व्यवस्थित रित्या प्रशालेतीत प्रत्येक विद्यार्थी पुस्तकाविना वंचित राहू नये यासाठी नियोजन केले असून राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके दिले जातील. या प्रसंगी मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, पर्यवेक्षक कुमार निकम, बालाजी गोरे, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ तसेच सर्व इयत्ता शिक्षक शिक्षिकांनी वाटपास सहकार्य केले.
