धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात दि. 26.07.2026 रोजी सुरक्षा निरीक्षक योगेश फडके यांना एक पॉकेट सापडले. त्यांनी तत्परता व प्रामाणिकपणा दाखवत ते पॉकेट मंदिर संस्थानच्या कंट्रोल रूममध्ये जमा केले.
पॉकेटची पडताळणी केली असता त्यामध्ये 8 हजार 812 रूपये रोख रक्कम तसेच एक पेन ड्राइव्ह व काही महत्वाची कागदपत्रे असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित भाविक महिलेची ओळख व खात्री करून सदर पॉकेट त्यांना सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले. सदर भाविक महिलेचे नाव दुर्गाराणी असून त्या आंध्रप्रदेश येथील रहिवासी आहेत. हरवलेले पॉकेट व त्यातील सर्व साहित्य सुरक्षितपणे परत मिळाल्याने त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच सुरक्षा विभागाचे आभार व्यक्त केले.
