भूम (प्रतिनिधी)- भाजप कार्यालय, भूम येथे राष्ट्रीय अखंडतेचे मूर्तिमंत प्रतीक, भारतीय जनसंघाचे संस्थापक, महान विचारवंत आणि आमचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर,तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, शहरअध्यक्ष बाबासाहेब वीर, सरचिटणीस घुनाथ वाघमोडे, प्रदीप साठे, विकास जालन, राम पवार, बाबुराव साळूंके, रणजीत वारे, सोमनाथ वारे, सुरेश उपरे, सिद्धार्थ जाधव, तानाजी साबळे, सुनील बरकडे, सागर चोरमले आदि पदाधिकारी उपस्थित होते.
