भुम (प्रतिनिधी)-  शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी आणि NEET पेपरफुटी प्रकरणाबद्दल संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील जंतर-मंतर या ठिकाणी जमा होऊन जे आंदोलन उभा केलं त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलना च्या दबावापोटी केंद्र सरकारला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. म्हणून भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विद्यार्थी एकजुटीचा विजय जल्लोष साजरा करण्यात आला.

या निमित्ताने भूम येथील थ्री  एस.अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे हा विजय मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सिराज मोगल, धाराशिव NSUI चे जिल्हाध्यक्ष ॲड. मुशरफ सय्यद, माजी नगरसेवक सोपान वरवडे, युवक काँग्रेसचे मोईज सय्यद, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. घनश्याम लावंड, भीमराव देशमुख, उमेश ढगे, व्हीजेएनटीचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव, सरीपुत भोसले, अविनाश शेळके, मयूर मोरे, शफीक शेख, सर्फराज मोगल, साकिब मोगल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top