धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक यशवंत कडाप्पा इंगळे यांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष्यांनी त्यांना पुढील सुखी, समृद्ध,आरोग्यमय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन संस्थेसाठी  केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख करत पुढेही प्रसंगोचित सहकार्य कराल अशी अपेक्षा  व्यक्त केली. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, वित्त लेखाधिकारी तथा संस्था सदस्य संतोष कुलकर्णी, युवा नेते तथा उद्योजक अभिराम पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, मा. उप मुख्याध्यापक प्रमोद कदम पर्यवेक्षक प्रवीण बागल,  बी.बी.गुंड, कुमार निकम, बालाजी गोरे, राजेंद्र जाधव, शेषनाथ वाघ , गुरुवर्य के.टी.पाटील फाऊंडेशन प्रमुख शरद क्षिरसागर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top