धाराशिव (प्रतिनिधी)-  स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी, शासकीय भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ आणि वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी आणि युवकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या व्यवस्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात यावी, पेपरफुटी व भरतीतील गैरव्यवहारासाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच प्रत्येक पात्र युवकाला न्याय मिळावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, खलिफा कुरेशी, बबलु भाई शेख, व तेजस भालेराव, नरसिंह मेटकरी, पंकज भोसले, सुनील आंबेकर, बाबा मुजावर, रवी ठेंगल, अजिंक्य हिबारे, अविनाश जाधव, प्रवीण घोलप, अमर गुंड, मजहर शेरिकल, रणवीर इंगळे, कुणाल कर्णवर, पृथ्वीराज मुळे, रणवीर बर्डे, दत्ता लोंढे, शुभम सुकाळे, ज्ञानेश्वर निंबाळकर, सुरज वडवले  यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 
Top