मुरूम (प्रतिनिधी)- धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याबद्दल आमदार बसवराज पाटील यांचा अंबरनगर ग्रामस्थांच्या वतीने रविवारी (ता. 26) रोजी सत्कार करण्यात आला.
सरपंच किसन जाधव आणि माजी सरपंच धेनू पवार यांच्या हस्ते आमदार बसवराज पाटील यांना शाल, फेटा व हार घालून सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्त्यांचे सहअध्यक्ष शरण पाटील यांचाही पोमा पवार आणि धेनू जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संवाद साधताना आमदार बसवराज पाटील यांनी अंबरनगर येथील स्मशानभूमीचा प्रश्न आणि इतर अडचणी लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच, या संदर्भातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच विशेष बैठक घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली; यावेळी त्यांनीही अंबरनगरच्या विकासात्मक प्रश्नांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सत्कार सोहळ्यासह या प्रसंगी धेनू जाधव, चंद्रकांत जाधव, भीमा राठोड, देविदास राठोड, दासू राठोड, रोहिदास पवार, बाबू जाधव, वसंत जाधव, विलास जाधव, राजेंद्र जाधव, गुलाब जाधव, संजय जाधव, दिनेश जाधव, हर्षवर्धन जाधव, कार्तिक जाधव, सचिन राठोड यांच्यासह अंबरनगरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
