धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी आगमनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार), धाराशिव शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला युवक, नागरिक व रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.

समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव दाखवून दिली. उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत नागरिकांनी नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, नगरसेवक तथा शहराध्यक्ष आयाज शेख, नगरसेवक पंकज  भोसले, एजाजभाई काझी, शहर कार्याध्यक्ष नरसिंहभैय्या मेटकरी, रोहित भैय्या बागल, शहर संघटक कुणाल कर्णवर, मिलिंद आप्पा पेठे, अजिंक्य हिबारे, दराडे सर, अर्चना ताई अंबुरे, ज्योतीताई माळाळे, रणवीर बर्डे, ओंकार गपाट यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांचे आभार मानत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


 
Top