तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील महाद्वार चौकातील व्यापाऱ्यांनी दुकानदारांना तीन फूट फूटपाथ वापरण्याची तसेच पाच फूट सायबान उभारण्याची परवानगी द्यावी व महाद्वार खुले करावे , अशी मागणी करीत बुधवार दिनांक ३ रोजी मंदिर परिसरातील दुकान बंद करून ठिय्या आंदोलन केले होते अखेर नगराध्यक्ष मुख्याधिकारी व व्यापारी प्रतिनिधी यांच्या चर्चा होऊन तोडगा निघाल्याने व्यापाऱ्यांनी बंद व हे आंदोलन मागे घेतले
महाद्वार चौक व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषदेमार्फत राबविण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम योग्य व कौतुकास्पद आहे. अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या महाद्वार चौकाला मोकळा श्वास मिळाल्याने व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे अभिनंदनही केले आहे.
मात्र, व्यापाऱ्यांना जागेचा अभाव पाहता तीन फूट फुटपाथ वापरण्यास व पाच फूट सायवान उभारण्यास परवानगी देण्यात यावी,
तसेच मंदिर संस्थानमार्फत भाविकांसाठी बंद करण्यात आलेला महाद्वार प्रवेश मार्ग पूर्ववत सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी महाद्वार परिसरातील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून मंदिर प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले . म. या अचानक पुकारलेल्या दुकान बंद आंदोलनामुळे भाविकांची गैरसोय झाली या आंदोलन स्थळाला नगराध्यक्ष विनोद गंगणे भेट देवुन व्यापार्यांशी चर्चा केली चर्चां अंती हे आंदोलन मागे घेण्यात आले