अभिषेक पूजेसाठी भाविकांना टोळभैरव मार्गे सोडण्याची मागणी
तुळजापूर.- श्री तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पूजेसाठी भाविकांना टोळभैरव मार्गे सोडण्याची मागणी नगरपरिषद गट नेते औदुंबर कदम यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, यांच्याकडे निवेदन देऊन केले आहे
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी व कुलाचार करण्यासाठी येणाऱ्या
भाविकाचा मार्गात बदल केला असून सद्या भाविकांना अभिषेक पुजेसाठी सुद्धा भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे सोडण्यात
आला आहे.
तरी सदरील मार्ग लांब असल्याने शुक्रवार पेठ, कमान वेस, मंकावती गल्ली, साळुंके गल्ली, भोसले गल्ली या
ठिकाणी पुजाऱ्यांची घर जास्त असल्याने पुजाऱ्याकडे येणाऱ्या भाविकांना मार्ग लांब होत असल्याने तसेच काही भाविक
वयोवृद्ध, लहान मुळे असल्याने अभिषेक पूजेचा मार्ग टोळभैरव मार्गे सोपा असून त्या मार्गाने सोडण्यात यावे. कारण कारण व्हीआय पी
दर्शन पास हा अभिषेक पूज्या झाल्यानंतर सोडत असल्यामुळे मंदिरात कोणत्या प्रकारची गर्दी होणार नसल्याने सदरील
अभिषेक पूजेसाठी भाविक टोळभैरव मार्ग हा योग्य आहे.
तरी सदरील विषय तात्काळ मार्गी लावण्यात यावा अशी मागणी निवेदन गटनेते औदुंबर कदम माजी नगराध्यक्ष सचिन रोच करी नगरसेविका नीता क्षीरसागर नगरसेवक
चंद्रशेखर भोसले लखन पेंदे
सुनील रोचकरी यांनी दिले