तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील बहुचर्चित यात्रा मैदान प्रकरणानी शहरातील महिला व पुरुषांनी गुरुवार दिनांक 25 रोजी सकाळी यात्रा मैदान प्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले मात्र मुख्याधिकारी हे बैठकीनिमित्त मुंबईत गेले असल्याने व मुख्याधिकारी यांना निवेदन देवून ही ते उपस्थित नसल्याने आंदोलन करते आणि तीव्र नाराजी व्यक्त केली व यापुढे आंदोलनाची तीव्र करण्याचा इशारा यावेळी दिला तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील धाराशिव रोडवर असणाऱ्या यात्रा मैदान प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना 52 ऑब्लिक 53 नुसार कारवाई करावी अतिक्रमण काढावे व संबंधितावर चारशे वीस चे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी यापूर्वी निवेदन देण्यात आले होते निवेदनाची मुदत संपल्यानंतर आज महिला व पुरुषांनी नगरपरिषदेत येऊन नगरपरिषद मुख्याधिकारी दलाल व बाहेर हे आंदोलन केले यावेळी यात्रा मैदान झालेच पाहिजे संबंधित दोषीवर कारवाई झालीच पाहिजे या जोरदार घोषणाने नगरपरिषद परिसर दणाणुन गेला होता.
यात्रा मैदानासंदर्भात नगर परिषदेकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. दिनांक 25 मे 2026 रोजीही मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन यात्रा मैदानाबाबत प्राप्त झालेल्या अहवालावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
नगरसेविका प्रगती किरण कदम यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मुख्याधिकारी दालनात ठिय्या मांडत प्रशासनाचा निषेध केला. “यात्रा मैदान हा तुळजापूरकरांच्या अस्मितेचा विषय असून नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला आता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,“ अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी बोलताना अमोल जाधव म्हणाले की रोहित पवार यांनी बोलल्यानंतर नगर परिषदेचे अधिकारी पत्र घेऊन आले त्यामुळे यांनी या आंदोलनाचा विशेष दखल घेतली नसल्याचे दिसून येत असल्याने सीओवर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली. दरम्यान, या आंदोलनामुळे नगर परिषद परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचे प्रयत्न केला पण आंदोलन करते कारवाईवर ठाम राहिल्याचे दिसून आले त्यामुळे पुढील घडामोडीकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.
यावेळी बोलताना नगरसेविका प्रगती ताई लोंढे म्हणाल्या की या आंदोलनाबाबत आम्ही पूर्व सूचना देऊ नये मुख्याधिकारी गैरहजर राहिल्याने यापुढे हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला यावेळी बोलताना अमोल जाधव म्हणाले की आम्ही आंदोलनाला बसलो असता रोहित पवार यांनी त्यांना बोलल्यानंतर हे पत्र घेऊन आले मात्र आमचा एकच म्हणणं आहे बावन 53 नुसार कारवाई करा अतिक्रमण आठवा संबंधित जोशींवर 402 वी चा गुन्हा दाखल करा व सिवावर तात्काळ कारवाई करा यादव आंदोलनात शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते व दीर्घकाळ हे आंदोलन चालले.
