धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव तालुका काँग्रेस पार्टीच्यावतीने टाकळी बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप तर आळणी येथे वृक्षारोपण दि.19 जून रोजी करण्यात आले. 

धाराशिव तालुक्यातील आळणी व टाकळी बेंबळी येथे आयोजित कार्यक्रमास तालुका काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विनोद वीर, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष दिगंबर गायकवाड, आदम शेख, गहिनीनाथ सोनटक्के, आत्माराम शेंद्रे, मतीन पठाण, दादा जाधव, सूरज लतूरे, मलिक शेख, मन्सूर पठाण लक्ष्मण पाटोळे, महेश लोखंडे, समीर पठाण दादा पवार, विश्वास वीर, अंकुश कोरे, धनंजय वीर, संतोष वीर, जीवन तांबे, प्रदीप वीर, बाळासाहेब गोरे, धोंडीराम कोळी, भालचंद्र तौर, अविनाश कदम, किसन जाधव आदींसह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top