धाराशिव (प्रतिनिधी)- परीक्षा पेपर फुटी, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देणे, युवा बेरोजगार हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद व नगर परिषद सदस्यांनी महाविकास आघाडीला सहकार्य करावे, असे आवाहन उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक संस्था विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील उपस्थित होते. 

बुधवार दि. 17 जून रोजी काँग्रेस भवन येथे घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस प्रतापसिंह पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा विजय निश्चित असून, मॅजिक फिगर आम्ही निश्चित मिळवू असे त्यांनी सांगितले. काही मतदारांना सहलीवर पाठविण्यात आले आहे त्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता देशमुख आणि पाटील यांनी महायुतीला विश्वास नसल्यामुळेच मतदार एकत्र करून सहलीवर पाठविले आहेत असे सांगितले. यावेळी राजाभाऊ शेरखाने, खलील सय्यद उपस्थित होते. 

 
Top