जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा.श्री कीर्ती किरण पुजार यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे घेतले दर्शन
जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा.श्री कीर्ती किरण पुजार यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे भक्तिभावाने दर्शन घेतले. अधिक मासानिमित्त त्यांनी श्री तुळजाभवानी देवीजींची आरती केली तसेच सपत्नीक श्री देवींची ओटी भरून श्री देवीजींचे आशीर्वाद घेतले.
तत्पूर्वी त्यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या जतन, दुरुस्ती व संवर्धनाच्या कामांची पाहणी करून संबंधित कामांचा आढावा घेतला. तसेच भाविक भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधा आणि सुरू असलेल्या विकासकामांची माहिती जाणून घेतली.
यावेळी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.