धाराशिव (प्रतिनिधी)- जी रामजी योजनेच्या माध्यमातून वैयक्तीक सिंचन विहिरी पुर्ण झाल्या आहेत. आता त्यांना पुन्हा अपलोड करण्यास सांगितले. तर ते शक्य नाही त्यामुळं ही अट वगळून पैसै द्यावेत. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली.
आमदार कैलास पाटील म्हणाले की, वैयक्तीक सिंचन विहिरीचे कामे होतात. पण ज्यावेळी लाभार्थ्यानी चार नंबरचा अर्ज भरलाय मात्र तो त्यावेळी अपलोड करण्यास अडचण आली होती. ही चूक कर्मचारी व यंत्रणेची आहे. आता परत त्यांना फोटो अपलोड करण्यास सांगितले तर त्यांनी मजूर कुठून आणायचे? असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित करून ही अट रद्द करण्याची मागणी केली. शिवाय सद्या या योजनेतून रस्ते व सार्वजनिक कामासाठी पैसै दिले जात आहेत. पण वैयक्तिक लाभाच्या म्हणजे विहरी, फळबागा, घरकुल यासाठी पैसै दीले जात नाहित. यासाठी पैसै द्यावेत अशीही मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली.
मंत्र्याकडून मागणी मान्य
यावेळी उत्तर देताना भरत गोगावले यांनी वस्तुस्थिती मान्य केली व विहिरीचे पैसै विनाअट देऊ असे आश्वासन दिले. तसेच वैयक्तीक लाभाच्या योजनासाठीही पैसै देऊन अडचणी दुर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही मंत्री गोगावले यांनी सांगितले.
