श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण

नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली.

सचिन खिल्लारे हे आज आपल्या कुटुंबीयांसह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी एक किलो वजनाची चांदीची श्री तुळजाभवानी देवींची मूर्ती श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केली.

या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सचिन खिल्लारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास वाणी, मनोज कदम तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
 
Top