अधिक मासातील रविवारी तुळजाभवानी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी.

 आचारसंहिता सामान्य भाविकांसाठीच का!
तुळजापूर : अधिक मासातील शनिवार रविवार सलग सुट्ट्या पार्श्वभूमीवर हे तुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती भाविकांच्या वाढत्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांनी केलेल्या व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले .    

रविवारी हजारो अनेक देवीभक्तांनी श्री तुळजाभवानी मातेचा कुलधर्म आणि कुलाचार मोठ्या भक्तिभावाने पार पाडला. महिला भक्तांकडून अनारसे, बतासे, दिवे, पुरणाचे धोंडे आदी पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात येत होते. “अधिक मासातील दर्शन पुण्यप्रद मानले जाते,” अशी भाविकांची श्रद्धा असल्याने यंदा भाविकांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

पेड पासधारकांना व्हीआयपी वागणूक; सामान्य भाविकांची मात्र फरफट कायम !



तुळजाभवानी मंदिरातील दुहेरी निकषांवर संताप; ‘आईच्या दर्शनासाठी दुझाभाव का?’ असा भाविकांचा सवाल

. आचारसंहिता सामान्य भावी कासाठीच का!

 सध्या सामान्य भाविकांना एका मार्गाने प्रवेश दिला जात असताना पेड पासधारक आणि व्हीआयपींना वेगळीच सवलत दिली जात असल्याने मंदिर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.भाविकांच्या मते, आचारसंहितेचे कारण पुढे करून सर्वसामान्य भक्तांना अनेक निर्बंध लावले जात आहेत. मात्र त्याचवेळी काही लोकप्रतिनिधी किंवा मान्यवर व्यक्ती मंदिरात येत असताना त्यांच्यासोबत दहा-दहा, पंधरा-पंधरा जणांना थेट प्रवेश दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे "आचारसंहिता फक्त सामान्य भाविकांसाठीच आहे का?" असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.५०० रुपयांच्या पासला राजेशाही महाद्वारातून प्रवेश, २०० रुपयांच्या पासधारकांची पायपीट 

 
1001291051.jpg

सध्या ५०० रुपयांचा पेड पास घेणाऱ्या भाविकांना शहाजीराजे महाद्वारातून थेट प्रवेश दिला जातो. तर २०० रुपयांच्या पासधारकांना बिडकर तलाव-घाटशिळ रोड पार्किंग परिसरातून प्रवेश करावा लागत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात पायपीट होत आहे. यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.‘खरा व्हीआयपी वंचितच’
आई तुळजाभवानी ही गोरगरीबांची आणि सर्वसामान्यांची कुलस्वामिनी आहे. मात्र सध्याच्या व्यवस्थेत खरा व्हीआयपी असलेला सामान्य भाविकच दर्शनापासून वंचित राहत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे. पैशाच्या जोरावर वेगळे मार्ग आणि वेगळ्या सुविधा उपलब्ध होत असल्याने मंदिरातील समानतेच्या तत्त्वालाच तडा जात असल्याची चर्चा भाविकांमध्ये सुरू आहे.पेड पास व्यवस्था रद्द करण्याची मागणी

भाविकांनी ५०० रुपये आणि २०० रुपये अशा पेड पासची व्यवस्था पूर्णपणे बंद करून सर्वांना समान वागणूक द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. तसेच आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना घाटशिळ रोड-बिडकर तलाव परिसरातून एकाच पद्धतीने प्रवेश देऊन कोणताही भेदभाव न करता दर्शन व्यवस्था राबवावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.भाविकांच्या नाराजीची प्रशासन दखल घेणार का?

आचारसंहिता, जीर्णोद्धार आणि सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली सुरू असलेल्या या कारभारामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत समान दर्शन व्यवस्था लागू करावी, अन्यथा भाविकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
Top