अधिक मासात तुळजापूरला भाविकांचा महासागर; १५ दिवसांत जवळपास सात लाख भक्तांचे दर्शन
उन्हाच्या तडाख्यातही भक्तीचा उत्साह कायम; ३० मे रोजी विक्रमी ५० १८ १ भाविकांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष धार्मिक महत्त्व असून या कालावधीत कुलदैवतासह विविध देवतांचे कुलधर्म, कुलाचार व धार्मिक विधी पार पाडणे पुण्यप्रद मानले जाते. त्यामुळे राज्यासह देशभरातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदाचा अधिक मास उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आल्याने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये भाविकांचा अक्षरशः महासागर उसळला आहे.
अधिक मास सुरू झाल्यापासून २९ मेपर्यंत तब्बल ६ लाख ९४ हजार १४४ भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले आहे. मागील अनेक वर्षांतील गर्दीचे सर्व विक्रम यंदा मोडीत निघाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे या गर्दीत महिला भाविकांची संख्या लक्षणीय असून सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, व्यापारी, उद्योगपती, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांचाही मोठा सहभाग दिसून येत आहे.
४० अंश तापमानातही भक्तीचा ओघ कायम
तुळजापूर परिसरातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जात असतानाही भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. अधिक मासातील कुलधर्म, कुलाचार, नवसपूर्ती आणि धार्मिक विधींसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
व्हीआयपी दर्शन बंद; तरीही गर्दीवर परिणाम नाही
भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने रेफरल व व्हीआयपी दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद केली आहे. मात्र, याचा भाविकांच्या ओघावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट दिवसेंदिवस दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर सलग २२ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन, मंदिर कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
भाविकांसाठी विशेष सुविधा
वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती आणि प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत.
मंदिरासमोरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
भवानी रोड आणि महाद्वार रोडवर शेडनेट उभारण्यात आले आहे.
भाविकांच्या पायांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विशेष मॅट टाकण्यात आले आहेत.
सतत पाण्याचे फवारे मारून परिसर थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
अंध व दिव्यांग भाविकांसाठी मोफत ई-रिक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सुट्ट्यांच्या दिवशी गर्दीचा उच्चांक
मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार तसेच पौर्णिमेच्या दिवशी भाविकांची संख्या अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. धर्मदर्शनासाठी सर्वाधिक भाविक येत असून त्यानंतर सशुल्क दर्शन, मुखदर्शन आणि अभिषेक दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आहे.
यंदाचा अधिक मास उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आल्यामुळे भाविकांसाठी धार्मिक पर्वणी ठरत असताना व्यापारी वर्गासाठीही हा कालावधी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरत आहे.
२९ मे रोजी विक्रमी दर्शन
अधिक मासातील पंधरा दिवसांमध्ये २९ मे २०२६ रोजी सर्वाधिक ४९ हजार ९५२ भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. हा आकडा यंदाच्या अधिक मासातील सर्वाधिक दैनिक उपस्थितींपैकी एक मानला जात आहे.
दिवसनिहाय दर्शन संख्या
दिनांक भाविक संख्या
15 मे 2026 40,946
16 मे 2026 38,691
17 मे 2026 49,095
18 मे 2026 40,672
19 मे 2026 46,698
20 मे 2026 36,597
21 मे 2026 39,707
22 मे 2026 47,942
23 मे 2026 43,265
24 मे 2026 49,952
25 मे 2026 40,352
26 मे 2026 47,846
27 मे 2026 38,097
28 मे 2026 44,151
29 मे 2026 49,952
30 मे2026 50181
एकूण भाविक संख्या : ६,
*१५ मे ते ३० मे २०२६ - देणगी दर्शन पास*
ऑनलाईन २०० रु - ३०४८
ऑफलाईन २०० रु - ४८७३३
एकूण २०० रु पास - ५१७७६
ऑनलाईन ५०० रु - २०३९
ऑफलाईन ५०० रु - १६७९९
एकूण ५०० रु पास - १८८३८
तुळजाई नगरीत भक्तीचा मंगलमय उत्सव
अधिक मासाच्या निमित्ताने संपूर्ण तुळजापूर नगरी भक्तीमय, धार्मिक आणि उत्सवी वातावरणाने नटली आहे. प्रखर उन्हाचा सामना करत लाखो भाविक आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत आहेत. आगामी प दिवसांमध्ये भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तुळजापूरमध्ये भक्तीचा हा महोत्सव पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे चित्र आहे.