शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा वसा आणि वारसा चालवणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक वनिता बाबर यांनी केले
तुळजाभवानी महाविद्यालयामध्ये शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.
डॉ.नेताजी काळे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. सदर प्रसंगी प्रमुख व्याख्यात्या प्रा.वनिता बाबर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, शिक्षणमहर्षी बापूजींनी सामाजिक, शैक्षणिक व स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांनी ज्ञानोजीरावांनी धार्मिक संस्काराचे व राम भक्तीचे धडे दिल्यामुळे त्यांच्या मनात श्रद्धा व गोर-गरीब ,वंचित, दलित लोकांविषयी प्रेम निर्माण झाले होते. बापूजींची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती, महाविद्यालयात शिकत असतानाच स्वातंत्र्य चळवळ, समाजकारण, शिक्षण व्यवस्था या विषयावर त्यांचे वाद-विवाद रंगत असत.याच चर्चेतून इस्लामपूरला श्रीराम समाज सेवा मंडळाची स्थापना झाली, आणि त्याचे अध्यक्षपद बापूजींनी भूषविले. बापूजीं एक उत्तम शिक्षक, कुशल मुख्याध्यापक, हुशार प्रशासक व उत्कृष्ट समाजसेवक म्हणून भूमिका पार पाडल्या. त्यांच्या अशा कार्यातूनच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचेआज खूप मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले दिसते.