धाराशिव (प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिव च्या वतीने दिनांक २६ जून २०२६ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती राजर्षी छत्रपती शाहू चौक धाराशिव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
नगर परिषद धाराशिव च्या नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आले . राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकाचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येईल असे आश्वासन नगर परिषद धाराशिव च्या नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांनी दिले.
यावेळी प्रा.रवी सुरवसे यांनी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले तसेच त्यांनी पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे च्या धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्या बदल उमेश राजेनिंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिव चे अध्यक्ष बलराज रणदिवे यांनी प्रास्ताविक तर सचिव बालाजी तांबे यांनी सूत्रसंचालन केले.
या जयंती सोहळ्यास ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम.डी. देशमुख,प्रा. कॅप्टन बी. बी. बागल,नगरपरिषद धाराशिव चे नगरसेवक अभिजीत काकडे, सुशांत सोनवणे, दिपाली पाटील, अलका पारवे, विलास लोंढे, आकाश तावडे,प्रवीण माळी, बापू पवार,सिद्धार्थ बनसोडे, अक्षय जोगदंड, राहुल काकडे,अमोल राजेनिंबाळकर, दाजीआप्पा पवार, धनंजय पाटील, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सोमनाथ गुरव, भा.न. शेळके, शीला उंबरे, रोहित पडवळ,महादेव माळी, यु.व्ही.माने, राम चंदनशिवे,विजय गायकवाड,कुणाल निंबाळकर,मुकुंद घाटगे, विजय पवार, ॲड. तसलीम काझी, प्रा. अभिमान हंगरगेकर, उमाकांत कुलकर्णी, अमोल पडवळ, आकाश मुंडे,प्रशांत सावंत,रणजीत बनसोडे, दिलीप वाघमारे, यशवंत समुद्रे, लहू शिंदे, प्रा.आबा गाठे, शंकर खुणे, ॲड. जयप्रकाश साळुंके,लक्ष्मण भालेराव, अनंत वाघमारे,बाळासाहेब माने,प्रदीप शिंदे, प्रभाकर बनसोडे, यु.व्ही. माने, अमोल घोगरे,पांडुरंग मते, समता सैनिक दलाचे नामदेव वाघमारे, सचिन दिलपाक आदी उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार उमाकांत कुलकर्णी यांनी मानले.
