धाराशिव (प्रतिनिधी)-  अणदूर येथील शेतकऱ्यांनी खतात मातीचा भडीमार केल्याचा आरोपी करीत जिल्हा कचेरीच्या आवारात गुरूवारी खताचे पोते फोडली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने अणदूर व नळदुर्ग येथील कृषी सेवा केंद्राची झडती घेवून तपासणी केली. तीन खतांचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीस पाठविण्यात आले आहेत. ओंकार कृषी सेवा केंद्र चालकाचा खत, बियाणे, किटकनाशके विक्रीचा परवाना निलंबित केला आहे. 

अणदूर व नळदुर्ग येथील ओंकार कृषी सेवा केंद्रातून खताच्या नावाने शेतकऱ्यांच्या माथी माती मारली जात असल्याचे सांगत थेट जिल्हा कचेरी गाठून खताचे पोती फोडून जिल्हा अूीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे कृषी सेवा केंद्र चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. कृषी अधिकाऱ्यांनी थेट अणदूर गाठून रात्री उशिरापर्यंत कृषी सेवा केंद्र व गोडाऊनमधील खतांची तपासणी केली. 


 
Top