धाराशिव (प्रतिनिधी)- नीट व टीईटी  पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्हा युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि.29) निषेध मशाल मोर्चा काढण्यात आला. सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

काँग्रेस भवन येथून सुरू झालेला मशाल मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचला. तेथे सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत मशाल मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी युवक व विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नीट व टीईटी पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय व राज्यातील शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच स्पर्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने घेण्यात याव्यात, दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशीही मागणी करण्यात आली.

वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि पालकांच्या भावनांशी खेळत असून या प्रकारांमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी युवक व विद्यार्थी काँग्रेसचा लढा यापुढेही अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या युवक व विद्यार्थी काँग्रेस च्या निषेध मशाल मोर्चास धाराशिव काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह  राजेंद्र शेरखाने,माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,  धनंजय राऊत, विनोद वीर, ॲड.सिराज मोगल,आप्पा शेळके खलील सय्यद,अग्निवेश शिंदे,महेबुब पटेल,ज्योती सपाटे,निलेश गायकवाड,गणेश पवार,दिलीप गारगुंड,प्रदीप सस्ते ,हरिभाऊ शेळके ,शहाजी मुंडे ,संकेत पडवळ,मिलिंद गोवर्धन, काझी जावेद अभिमान पेठे, अशोक बनसोडे भैय्या निरपळ, सरफराज काझी,प्रभाकर लोंढे,जालिंदर केंद्रे ,अप्पा निमसे ,काझी जावेद, अभिषेक बागल, मोईज सय्यद, पृथ्वीराज देशमुख अमोल कुतवळ,रोहित कसबे,संजय गजधने,हरिदास शिंदे ,भागवत पेठे ,किशोर राऊत , अकबर शेख राजुदास आडे, भूषण देशमुख, अझर पठाण,विजय मुद्दे,  फुरखान शेख,सुदर्शन वाघमारे, धनाजी पाटील,सुदर्शन माने,  समीर कोरबू,यांच्यासह युवक व विद्यार्थी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top