सामाजिक अधिक मास
स्कूल बॅगचे वाटप !
===========================
धाराशिव येथील सौ उज्ज्वला कुलकर्णी यांच्या पुढाकाराने व धारासुर मर्दिनी महिला फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 जून रोजी अमेरिका येथील बहीण शिल्पा अजय डोंगरे ,व पुणे येथील अपर्णा पुराणिक आणि अश्विनी कुलकर्णी यांनी याही वर्षी पाचवी ते आठवीच्या 50 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे
तसेच खाऊ चे वाटप केले !
यावेळी त्यांच्या मातोश्री माननीय रत्नमाला ताई देशमुख ही उपस्थित होत्या ! बॅग वाटप आणि खाऊ वाटप करताना त्यांचा उत्साह कौतुकास्पद होता !
या कार्यक्रमा साठी हिप्परगा येथील पालावरच्या शाळेतील मुलांना उज्वलाताई कुलकर्णी यांनी घरी आमंत्रित केले होते.
स्कूल बॅग तसेच वडापाव आईस्क्रीम खाऊन मुलं आनंदित झाली
या कार्यक्रमास फेडरेशन चे -पदाधिकारी संगीता काळे, उज्वला मसलेकर उपस्थित होत्या .
सौ.अवंतिका जालनेकर, सौ.ज्योती राजेनिंबाळकर,सौ.संगिता देशमुख,सौ.पुष्पा डोळे,सौ.अस्मिता बेंबळीकर रेखा ढगे ,नीता कठारे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रयत्न केले.
प्रत्यक्ष हजर न रहाता आपल्या गावी एक सामाजिक बांधिलकी ची जाणीव व कृतज्ञता व्यक्त करण्याची या भगिनींची
ही पद्धत खरोखरचं कौतुकास्पद आहे !