तुळजापूर, : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी यंदाच्या अधिकमासा शेवटच्या दिवशी रविवारी दिनांक 14 रोजी भाविकांर्ची मोठी गर्दी झाली होती.
अधिकमास आणि उन्हाळ्याच्या अखेरच्या सुट्ट्यांची सांगड जुळल्याने राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे धाव घेतली. रविवारी (दि. १४) अधिकमासाच्या शेवटच्या दिवशीही दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंदिर परिसर, दर्शनरांगा, शहरातील प्रमुख मार्ग आणि पार्किंग स्थळे दिवसभर भाविकांनी फुलून गेली होती.
दरम्यान, मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे उपलब्ध जागा तुलनेने कमी झाली असताना भाविकांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे गर्दी नियंत्रण आणि दर्शन व्यवस्थापनाचे मोठे आव्हान मंदिर प्रशासनासमोर उभे राहिले होते.
गर्दीचा वाढता ताण लक्षात घेऊन मंदिर सलग २२ तास खुले ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. तरीदेखील दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ कमी होत नसल्याने मंदिर परिसरात सतत गर्दीचे वातावरण कायम होते.
रविवारी श्री तुळजाभवानी गरबा ग्रह व अभिषेक येथे बेशिस्त जाणवली मंदिर संस्थांचा अधिकारी गायब होताच अभिषेक रांगेत अनेक भाविकांना विना पाससोडल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर अभिषेक रांगेतील सीसीटीव्ही फुटेज पाहून व अभिषेक भाविक संख्या व आवश्यक रांगोळीतून सोडलेल्या भाविकांच्या संख्येची तुलनात्मक अभ्यास करून दोषी सुरक्षारक्षक विरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे मंदिरातील सुरक्षा रक्षक बाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला असून विना पास भावी सशुल्क रांगाभिषेक राम घुसत असल्याचा आरोप भाविकातून होत आहे तसेच मंदिरात साईनाथ असलेली पोलीसही शिस्त लावण्याबाबत दिसून येत नव्हते व ते एकत्र असेघोळ ळ्याने बसून चर्चा करत बसले होते मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून अशा कामचुकार पोलिसांवर हे कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत. आहे.