मा. रवींद्र खंदारे यांना डॉक्टरेट (पी. एच. डी ) मिळाल्याबद्दल अखिल म. प्रा.शिक्षक संघाकडून सत्कार
धाराशिव वार्ताहर
धाराशिव चे प्राथमिक शिक्षण अधिकारी मा. श्री. रवींद्र खंदारे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या कडून पी. एच डी. मिळाल्याबद्दल अखिल म. प्रा. शिक्षक संघा तर्फे अल्पसंख्यांक शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात लालासाहेब मगर, बशीर तांबोळी, बाळासाहेब वाघमारे, यांच्या हस्ते सहृदय सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच नूतन गटशिक्षणाधिकारी श्री प्रकाश पारवे यांचाही अखिल शिक्षक संघा तर्फे सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना सर्व शिक्षकांनी सतत वाचन केले पाहिजे व आपल्या गुणवत्तेत वाढ केली पाहिजे व त्याचा फायदा दैनंदिन अध्यापनात होतो व विद्यार्थ्यांना न्याय मिळतो तेव्हा अगोदर शिक्षकांनी वाचनशील बनले पाहिजे असे प्रतीपादन केले या कार्यक्रमासाठी सुरेश भालेराव, मालोजी वाघमारे, मारुती काळे, इलाही बागवान, शिवाजी साखरे, महावीर गडदे, महेबूब काझी, सचिन टाकपीरे, सतीश ढोणे, बापू कोळंगे, श्री मिलिंद जानराव, श्री गायकवाड यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते कार्यकामाचे सूत्रसंचालन श्री मालोजी वाघमारे यांनी केले तर आभार श्री शिवाजी साखरे यांनी मानले
