तुळजापूर (प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी येथील श्री तुळजाभवानी देवींचे भाविक प्रकाश भानुदास सुर्यवंशी यांनी आज श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी 1343 ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला.
प्रकाश सुर्यवंशी हे आज सकाळी श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भक्तिभावाने 1343 ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने प्रकाश सुर्यवंशी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. संस्थानतर्फे त्यांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देण्यात आली.
