धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालय येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती दिमाखात साजरी

निवृत्त प्रा. ए. डी. जाधव यांच्या व्याख्यानाने वकील बांधवांत स्फूर्ती संचारली.
धाराशिव: 01.06.2026 धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालय येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची  301 वी जयंती मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा व्याख्याते निवृत्त प्रा. ए. डी. जाधव यांच्या व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. खंडेराव चौरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधिज्ञ मंडळाचे सहसचिव ॲड संजय भोरे यांनी केले. त्यानंतर निवृत्त प्रा. ए. डी. जाधव यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यकारभावर व प्रशासनावर आपल्या पहाडी आवाजात एकदम विस्तृत व सखोल व्याख्यान देण्यास सुरुवात केली असता वकील बांधवांत स्फूर्ती संचारली जसे काय जणू साक्षात अहिल्याबाई होळकरांचा जीवनपट अनुभवत आहोत अगदी तसेच व्याख्यान निवृत्त प्रा. ए. डी. जाधव यांनी केले. त्याचबरोबर आपल्या प्राध्यापक काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या सर्वच विद्यार्थी जे की आज वकील आहेत त्यांच्या महाविद्यालयीन काळातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण ॲड. खंडेराव चौरे यांनी केल्यानंतर आभार ॲड मैंदाड यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हा विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर नन्नवरे,सचिव बाळासाहेब आवड,ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शांतीलाल कोचेटा, ॲड.अविनाश देशमुख, ॲड. शिवाजी भोरे, ॲड. अशोक गाजरे, ॲड. अमोल वरुडकर, ॲड. युवराज खैरे आदींसह वकील बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
Top