धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील सुरक्षा समितीच्या वतीने जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रुग्णसेविकांचा सन्मान करून त्यांच्या सेवाभावाला सलाम करण्यात आला.दि.12 मे रोजी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी परिचारिका तसेच रक्त केंद्र व रक्त घटक विलगीकरण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.त्यानंतर दि.13 मे रोजी नर्सिंग कॉलेज धाराशिव येथे परिचारिकांच्या सन्मानार्थ भव्य कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ तानाजी लाकाळ यांच्या सह इतर मान्यवरांच्या हस्ते फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण,दिप प्रज्वलन आणि भारतीय संविधान उद्देशिकेच्या सामुदायिक वाचनाने करण्यात आली.अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ यांनी परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देत रुग्ण सेविकांच्या निस्वार्थ सेवेला मानवतेचा खरा आधार असल्याचे सांगितले. सन्मानित परिचारिकांनी आपल्या मनोगतात सुरक्षा समितीने केलेल्या गौरवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “हा सन्मान आमच्या सेवाकार्याला नवी ऊर्जा देणारा आहे,” असे मत व्यक्त केले.यावेळी डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. सुरज चवरे,डॉ. विवेक कोळगे, प्रा. रविंद्र सुरवसे, सदस्य अब्दुल लतीफ, सदस्य गणेश वाघमारे, सदस्य बाळासाहेब जावळे,आरोग्य मित्र शेख रौफ, सदस्य सुमित्रा गोरे, सदस्य रिबेका भंडारी, डॉ. बाबासाहेब घाडगे,अंकीत सवाई यांच्यासह रक्त संक्रमण विभागातील डॉ. अभिजीत आचार्य, डॉ. सतिश तांदळे, डॉ. दिपमाला कारंडे, डॉ. दिनेश कोरे, विठ्ठल कांबळे, तिरुपती केंद्रे, प्रणाली भुरे, दिप्ती बंगले, जाकेर पठाण आदी अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी सह इतर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा देशमुख यांनी केले. प्रस्तावना सुमित्रा गोरे यांनी मांडली तर आभार प्रदर्शन अब्दुल लतीफ यांनी केले. आरोग्य मित्र शेख रौफ यांनी आपल्या खास शेरोशायरी शैलीतून फ्लोरेन्स नाईटिंगेल यांना अभिवादन करून कार्यक्रमाला रंगत आणली.
