धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात लोकराजा राजर्षी शाहू पुण्यतिथी दिनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग विस्तार अधिकारी भारत देवगुडे , प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे इ ५ वी पर्यवेक्षक शेषनाथ वाघ यांच्या हस्ते पुजन करण्यात आले त्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्राचार्य नन्नवरे यांनी राजर्षी शाहुमहाराज यांची शैक्षणिक , सामाजिक , कुस्ती , व्यवसायिक आदि गोष्टी जगाच्या नकाशावर समृद्ध कोल्हापूरचे नाव लौकिक केले . या अभिवादन प्रसंगी प्रशालेतील कलाध्यापक शिवाजी भोसले , सहशिक्षक हुकुमचंद कानडे , संतोष देशमुख ,ए.सी.पवार , सौ. देवकन्या कांबळे, रमेश जगताप, लिपीक नवनाथ तांबारे , अजित जगताप, सुहास वाघमारे ,उमेश गायकवाड , श्रीमती भाग्यश्री पवार, सेवक बापू आदमाने उपस्थित होते

 
Top