धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ त्यागमुर्ती माता रमाई यांच्या स्मारकास बौध्द उपासिका जयश्री बनसोडे, रमाई फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत, महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे महादेव माळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बौध्द उपासक गुणवंत सोनवणे यांनी सामुहिक त्रिशरण, पंचशील घेतले. यावेळी माता रमाई अमर रहे, माता रमाईंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे व्यक्तीमत्व घडविण्यात त्यागमुर्ती माता रमाई यांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. रमाईच्या व्यक्तीमत्वात त्याग, समर्पण, सहनशिलता, अन्यायाविरुध्द बंड करण्याची शक्ती, स्वाभिमानाचे प्रतिक म्हणजे माता रमाई होय. अनंत अडचणीचा सामना करत माता रमाईने बाबासाहेबांना शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. स्वत:च्या वेदना मनात ठेवून बाबासाहेबांच्या बरोबर त्या शेवटपर्यंत उभ्या राहिल्या. प्रचंड संयमी, साधी राहणी, परिश्रमशील वृत्ती, कुटुंबाविषयी व समाजाविषयी जिव्हाळयाची भावना त्यांच्यात होती. दारिद्रय, आरोग्याच्या सोयीचा अभाव यामुळे त्यांना स्वत:च्या अपत्यांना गमवावे लागले. पण त्या खचून गेलेल्या नाहीत. शेवटपर्यंत संघर्ष करत व समाजाची काळजी करत राहिल्या. म्हणूनच त्यांना माता रमाई म्हणून समाज ओळखतो आहे. त्या सर्व समाजाच्या आई रमाई झाल्या आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी एम.डी. जानराव, सुनिल बनसोडे, नितीन लांडगे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता समिती सदस्य सुशांत सोनवणे, कुंदन चिलवंत, शौर्य लोखंडे, प्रदिप शिंदे, सचिन दिलपाक, एस.एम. बनसोडे, अशोक बनसोडे, बलभीम कांबळे, धनंजय वाघमारे, पी.के. बनसोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विजय गायकवाड, स्वराज जानराव, प्रा. महेंद्र चंदनशिवे, अतुल लष्करे, दिपक सरवदे इत्यादी बौध्द उपासक, उपासिकांची उपस्थिती होती.


 
Top