भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूल भूमने प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना ता. बा. कांबळे, के. सी.पवार, यु. पी. पायघन, आर. एल. गाडे, डी. जी. गुंजाळ, पी. आर. मुकटे यांनी मार्गदर्शन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा हायस्कूलच्या वतीने पुष्पहार, प्रेरणादायी व्यक्तींची पुस्तके व पेन देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते. यावेळी इयत्ता आठवी वर्गातील चंदन अमोल जगदाळे, आदिती अर्जुन मदने ,कल्याणी सुनिले मोरे,कुणाल वैभव सानप तसेच पाचवी वर्गातील ज्ञानेश्वरी संदीप झांबरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला दिव्या विकास झांबरे ,ऋषीकांत गोपीनाथ ढगे, तेजस गोरख डमरे,अमोल जगदाळे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. जी. गुंजाळ यांनी केले.


 
Top