भुम (प्रतिनिधी)-  आज आरसोली येथे शिवपुत्र स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 369 व्या जयंतीनिमीत्त देशाच्या सीमेवर सेवा करत असलेले सैनिक तथा आरसोली गावचे सुपुत्र मेजर दिनेश मुंडेकर, मेजर अमोल पाटुळे, मेजर प्रशांत पाटुळे तसेच छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय येथे कार्यरत असलेले किशोर गायकवाड व महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले गावचे सुपुत्र अनिल पाटुळे, समाधान खराडे, प्रीतम नागटिळक या मान्यवरांच्या शुभहस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व राजांची महाआरती करून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली असून यावर्षी मात्र जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपल्याच गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या होतकरू तरुणांच्या हस्ते प्रतिमा पूजन केल्यामुळे गावातून कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

 
Top