धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषदेत आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त नगर परिषदेच्या सफाई कर्मचारी यांना सुरक्षा साधने भेट देवुन स्वागत करण्यात आले. यामध्ये प्राथमिक स्वरुपात 5 सफाई कर्मचारी यांना सुरक्षा साधने नगरपरिषद अध्याक्षा नेहा राहुल काकडे, मुख्याधिकारी निता अंधारे यांच्या हस्ते शेख गाीमिया , पूजा वाळा, शेख मुस्तफा, संगीता वाळा, राजन वाघमारे या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्यात आल. त्यावेळी सर्व समिती सभापती, नगरसेवक, नगरसेविका व उपमुख्याध्यापक तथा स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे यांचे उपस्थित सुरक्षा कीट देवून गौरवण्यात आले. केंद्र शासनाच्या नमस्ते योजनेअंतर्गत स्वच्छतेची काम करणाऱ्या सर्व सफाई वाटप होणार आहे.
