धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा निश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‌‘शाश्वत विकास ध्येय-जिल्हा निर्देशक आराखडा, धाराशिव जिल्हा‌’ या सन 2023-24 व सन 2024-25 या दोन पुस्तकांचे प्रकाशन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार आणि अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,मुंबई यांच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

या कार्यक्रमाला अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय,मुंबई येथील अतिरिक्त आयुक्त भांगे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्र. उपआयुक्त सु.न.जाधव तसेच सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोलापूर श्रीकांत कुंटला यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय,धाराशिव येथील कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाश्वत विकासाच्या विविध निर्देशकांवर आधारित तयार करण्यात आलेला हा आराखडा जिल्ह्याच्या नियोजन प्रक्रियेस दिशा देणारा ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


 
Top