तुळजापूर (प्रतिनिधी)- मंगळवारी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती ज्या भाविकांना मैत्री पौर्णिमे देणे देवीची वारी पूर्ण करता आली नाही अशा भाविकांनी आज रोजी मंगळवारी येऊन देवीजींचा पूजाअर्चा करून वारी सेवा अर्पण केली आज दिवसभर भाविकांची प्रचंड गर्दी तीर्थक्षेत्र तुळजापुरात झाली होती भाविकांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे एक वाजता धर्मदर्शनात खुले करण्यात आले होते दिविजेस भाविकांच्या अभिषेक पूजा सकाळी सहा वाजता प्रारंभ झाल्या त्या दहा वाजता संपल्यानंतर देवीचे वस्त्र अलंकार घालून नित्योपचार पूजा करण्यात आली. आज श्री तुळजाभवानी मंदिरातील दर्शन मंडप भाविकांनी भरून गेला होता तसेच अभिषेक सशुल्क दर्शन रांगा भाविकांनी भरभरून वाहिल्या रात्री मंदिरात छबिना काढण्यात आला या सोहळ्यात हजारो भाविक मनोभावे सहभागी झाले होते श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात अतिक्रमण आजही जैसे तेच होते याचा फटका भाविकांना मोठ्या प्रमाणात बसला.
