तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त मुख्य काल्याचा कार्यक्रमानंतर दिंडया आपापल्या गावी मार्गस्थ झाल्या. 

काल्याच्या कार्यक्रम निमित्ताने श्री संत गोरोबा काका व श्री नृसिंह यांची भेट संपन्न झाली. श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर येथे मुख्य काल्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी  हभप विवेकानंद महाराज गोसावी (पंढरपूर), हभप थोबडे महाराज (वाशी), हभप महेश महाराज भोरे (तेर) यांची किर्तने संपन्न झाल्यानंतर काल्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. मुख्य काल्याचा कार्यक्रम असल्याने श्री नृसिंह यांना उटी लाऊन अलंकार घालण्यात आले होते.


 
Top