तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातील आयोध्या नगर येथे आयोजित श्रीराम कथा सप्ताह सोहळ्यात कन्यांचा सन्मान करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालण्यात आला. या सोहळ्यात शिवसेना नेते विकास जाधव व उद्योजिका निताताई विकास जाधव पाटील यांच्या वतीने कन्हैया वारकरी संस्थेच्या 21 चिमुकल्या मुलींना ड्रेस वाटप करण्यात आले

रामकथा सप्ताहाच्या पवित्र वातावरणात आयोजित या उपक्रमात लहान मुलींना सन्मानित करण्यात आले. ड्रेस वाटपामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. या प्रसंगी सेवानिवृत्त पेशकार पोपटराव जाधव, उद्योजिका निताताई विकास जाधव पाटील, मरळ सर, बळी काका माने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामकथा सप्ताहासारख्या धार्मिक सोहळ्यात कन्यांचा सन्मान करून समाजात स्त्री सन्मानाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या धार्मिक सोहळ्यातून  समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.


 
Top